कंधार; पुढारी वृत्तसेवा : कंधार घोडज रस्त्यावर बाळंतवाडी गावाजवळ आज (दि. ५) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोन मोटारसायकलची समोरासमोर झाली.या अपघातात मोटारसायकली चक्काचूर झाल्या असून यात एकजण जागीच ठार झाला आहे.तर एकजण गंभीर जखमी आहे.
सविस्तर वृत्त असे की मयत बालाजी नारायण जाधव हा लोहा तालुक्यातील चोंडी गावाहून घोडज मार्गे कंधारकडे येत असताना गुलाब लक्ष्मण गीते हे कंधार वरून नागदरवाडीकडे येत होते. दरम्यान बाळंतवाडी गावाजवळ एमएच २६ डीके ६४५७ आणि एमएच २६ एएम ८३११ या दोन्ही मोटरसायकल समोरासमोर धडकल्या. यात बालाजी नारायण जाधव (वय ४५ वर्षे रा.चोंडी ता. लोहा) यांचा जागीच मृत्यू झाला असून गुलाब लक्ष्मण गित्ते (वय २७ वर्षे रा.नागदरवाडी ता. लोहा) हा युवक अपघातात जखमी झाला आहे. अपघातातील जखमी गित्ते यांच्यावर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालय नांदेड येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले.तर मयत जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी कंधार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.