हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणा-या ट्रॅक्टरची ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाकडून घटनेबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या असून, जिल्हा प्रशासनाकडून शक्य ती मदत करण्याच्या सूचना केल्या. हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथील महिला हळद काढणीसाठी जात होत्या. त्यावेळी ही घटना घडली. त्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते.