सणानिमित्त परिसरात विविध रंगांची सजावट केलेल्या बैलजोड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या. Pudhari
नांदेड

Bail Pola Nanded | सारखणीत बैल पोळ्याचा उत्साह; सजलेल्या बैलजोड्यांनी वेधले लक्ष

णानिमित्त परिसरात विविध रंगांची सजावट केलेल्या बैलजोड्या मोठ्या संख्येने दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sarkhani Village Bail Pola Celebration

सारखणी : सारखणी येथील हनुमान मंदिर परिसरात गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या या सणानिमित्त परिसरात विविध रंगांची सजावट केलेल्या बैलजोड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या.

बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी झुली, गोंडे, फुलांच्या माळा, आकर्षक सजावटीचे साहित्य तसेच पारंपरिक दागिने लावण्यात आले होते. सजलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हनुमान मंदिर परिसराला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याने सारखणीत दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT