बोलेरो वाहनासह एकूण १२ लाख २ हजार ७१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Pudhari
नांदेड

Nanded Drugs Seized | नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई; ‘प्रेगा गॅबलीन’च्या ११० प्रतिबंधित गोळ्यासह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघे ताब्यात

प्रतिबंधित औषधांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nanded Pregabalin Abuse Case

नवीन नांदेड : नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित औषधांविरोधातील मोहिमेला वेग देत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ‘प्रेगा गॅबलीन’ कॅप्सूलच्या ११० प्रतिबंधित गोळ्या जप्त करण्यात आल्या असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच बोलेरो वाहनासह एकूण १२ लाख २ हजार ७१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २०५ आणि ३(५) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून ‘प्रेगा गॅबलीन’ कॅप्सूलचे ११ पाकिटे, म्हणजेच एकूण ११० प्रतिबंधित गोळ्या जप्त केल्या. याशिवाय बोलेरो (एमएच-२६ सीएच-३८७६) हे वाहनही ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत जिनेश उत्तम देवडे, अविनाश गणेश गिरी, बुद्धभूषण गणेश हटकर आणि दिग्विजय गणेश कपाडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

प्रतिबंधित औषधांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT