नांदेड

Nanded accident | ऑटोरिक्षाला कारची धडक, एक जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

अपघाताच्या घटनेनंतर कार चालकाला उमरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते

पुढारी वृत्तसेवा

उमरी : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटोरिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने चोराची धडक दिल्याने ऑटोरिक्षामधील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना उमरी गोळेगाव रस्त्यावरील चिंचाळा गावाजवळ गुरुवारी (दि.१६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार, उमरी तालुक्यातील तळेगाव येथील संजय लिंगू शिगळे (वय : 35 वर्ष) आणि त्याचा भाऊ गजानन लिंगू शिगळे (वय : 28 वर्ष) हे दोघे भाऊ ऑटोरिक्षाने कारेगाव फाटा येथून घरच्या शेतातील पाईपलाईन करण्याचे पाईप घेऊन येत होते. त्यांचा ऑटोरिक्षा चिंचाळा गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने (कारचा क्रमांक एम एच 43 सी.एम. 0500) ऑटोरिक्षाला जोराची धडक दिल्याने ऑटोरिक्षामधील संजय शिगळे हा जागीच ठार झाला. गजानन शेगळे याला गंभीर दुखापत झाल्याने उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर कार चालकाला उमरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. याप्रकरणी कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान अपघातानंतर उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले. त्यानंतर तळेगाव व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT