Nanded Flood: गर्भवती महिलेला बोटीतून नेले रुग्णालयात, डोल्हारी सिरपली गावाचा संपर्क तुटला File Photo
नांदेड

Nanded Flood : गर्भवती महिलेला बोटीतून नेले रुग्णालयात, डोल्हारी सिरपली गावाचा संपर्क तुटला

शिरपल्ली, डोलारी गावात महसूल, वैद्यकीय पथकाची तत्परता

पुढारी वृत्तसेवा

Nanded Pregnant woman taken to hospital by boat

हिमायतनगर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डोल्हारी सिरपली गावाचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे ग्रामस्थांसह अबालवृद्ध तापीच्या आजाराने त्रस्त झाले होते. परंतु या गावात वैद्यकीय सेवा देणे शक्य नव्हते. गुरूवारी महसूल व वैद्यकीय पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या पूर्णतः संपर्क तुटलेल्या गावात बोटीद्वारे यशस्वीपणे पोहोचून मदतकार्य सुरू केले व एका गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात महसूल व वैद्यकीय पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या पूर्णतः संपर्क तुटलेल्या गावात यशस्वीपणे पोहोचून मदतकार्य सुरू केले. या मोहिमेत नायब तहसीलदार एच. जी. पठाण, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी सब्बनवार तसेच डॉक्टर व त्यांची टीम सहभागी झाली होती.

दिनांक १५ ऑगस्ट पासून मुसळधार पावसामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे पथकाला गावात प्रवेश करता आला नाही. अखेर गुरुवारी सकाळी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून पथकाने गावात प्रवेश केला. या मोहिमेत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी पोलिस पाटील मंदाबाई जाधव, डॉक्टर प्रताप परभनकर, डॉ. गोविंद वानखेडे आशा वरकर कांता तपासकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सिरपली येथील गर्भवती महिलेला पुरामुळे गावाबाहेर पडता येत नव्हते. महसूल व वैद्यकीय पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या संपर्क तुटलेल्या गावात वैद्यकीय पथकाने तात्काळ आरोग्य सेवा सुरू केली असून जखमी व आजारी ग्रामस्थांची तपासणी केली.

सुदैवाने गंभीर रुग्ण आढळून आले नाहीत. यासोबतच जुन्या व नुकसानग्रस्त वस्तूंची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT