Nanded post office agricultural store  
नांदेड

Nanded post office agricultural store -डाकघर की कृषी सेवा केंद्र? फलक डाकघराचा, दुकानात कृषी साहित्य; नागरिकांमध्ये संभ्रम

Nanded post office agricultural store - डाकघर आणि कृषी सेवा केंद्र एकाच जागेत!

पुढारी वृत्तसेवा

सारखणी (नांदेड): सारखणी येथे भारतीय डाक विभागाचे शाखा डाकघर आणि कृषी सेवा केंद्र एकाच जागेत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. डाकघराच्या नावाचा फलक असलेल्या ठिकाणी कृषीविषयक साहित्यही दिसत आहे. दोन्ही सेवांचे स्वरूप आणि त्यांची व्यवस्था स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टपालविषयक कामांसाठी नागरिक डाकघरात येतात. मात्र, एकाच जागेत कृषी सेवा केंद्रही असल्याने संबंधित ठिकाणी नेमक्या कोणत्या सेवा उपलब्ध आहेत, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. भारतीय डाक विभाग ही नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची सेवा असल्याने तिची स्वतंत्र ओळख, दर्शनी फलक आणि सेवा व्यवस्थेबाबतची माहिती सहज समजेल अशी असणे गरजेचे आहे.

संबंधित विभागांनी स्पष्टता द्यावी

डाकघर आणि कृषी सेवा केंद्र एकाच जागेत सुरू असण्यामागील अधिकृत व्यवस्था काय आहे, दोन्ही सेवांचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालते आणि त्यासाठी आवश्यक नियमांचे पालन केले जाते का, याची संबंधित विभागांनी पडताळणी करावी. भारतीय डाक विभाग आणि कृषी विभागाने या ठिकाणची पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच नागरिकांना संभ्रम किंवा गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT