Palghar Police Recruitment Pudhari
नांदेड

Police recruitment Nanded : नांदेडमध्ये भावी पोलिसांची आजपासून भरती प्रक्रिया सुरू

199 पदांसाठी 14 हजार 865 अर्ज

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः नांदेड मध्ये आज बुधवारी (दि.11)पासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेसाठी पोलीस दलाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 199 पदांसाठी 14865 उमेदवारांनी अर्ज केला आहे. भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये, यासाठी सिसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन तसेच साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून पाळत ठेवली जाणार आहे. दरम्यान पोलीस भरतीतील उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला तसेच आश्वासनाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आस्थापनावरील 199 पोलीस शिपाई पदासाठी 14865 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. सदरची प्रक्रिया डिजीटल तंत्रज्ञानाच्या मदतीन पारदर्शक व निपक्ष:पातीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी होणार आहे.

शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची, छाती मोजणे, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, आदी घटकांचा समावेश आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी शारीरिक चाचणी आरएफआयडी तंत्रज्ञान, बायोमॅट्रीक ऑटो फोटो कॅप्चर तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेण्यात येणार आहे. या सर्व बाबीमुळे मानवी हस्तक्षेप टाळून घावण्याची अचूक वेळ टिपण्यात मदत होणार असल्याचे सांगीतले जाते.

यासाठी पोलीस अधीक्षक 1, अप्पर पोलीस अधीक्षक 2, उपविभागीय पोलीस अधिकारी 5, पोलीस अधिकारी 60 तसे 250 पोलीस अमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला बुधवारी दि.10 रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्याने जाहीर केले जाणार असून, उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशाद्वारे दिली जाणार आहे.

कुठे होणार भरती प्रक्रिया

नांदेड शहारातील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर ही पोलीस भरतीची चाचणी होणार आहे.त्यामुळे परिक्षार्थींनी वेळेत मैदानावर उपस्थित राहून नोंदणी करावी असे आवाहन ही पोलीस मुख्यालय कार्यालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT