नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील पिंपळगाव येथील दगडे यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार अड्ड्यावर सुरू होता. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुंडलवाडी पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्यां १२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २ लाख ३४ हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, २५ हजार रुपये, चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.
या बाबत अधिक माहिती अशी की, कुंडलवाडी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या बाबाराव गंगाधर निमशेट्टे, हाणमंत अंबादास घोगरे, सचिन विश्वनाथ खंडगावे, रामदार बापुराव बागरे, अशोक लच्छीराम राठोड, श्रीकांत लिंबशेट्टे व चार दुचाकी चालक अशा १२ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलिस जमदार शिवराज संभाजी गंगुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाऱ्यांकडून चार मोटारसायकल, जुगाराचे साहित्य व नगदी २५ हजार रुपये असा २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
यातील चार जुगारी फरारी झाले असून, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, जमादार अर्जुन खनपट्टे, अजय बोलमवार, शिवराज गंगुलवार यांच्या पथकाने जुगाऱ्यांवर कारवाई केली.