नांदेड

नांदेड: माळाकोळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शांततेत मतदान

अविनाश सुतार

माळाकोळी, पुढारी वृत्तसेवा : लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच पॅनल प्रमुख व उमेदवारांची मतदारांची जुळवाजुवळ करण्याची व मतदान केंद्रावर मतदानासाठी आणताना दमछाक होताना दिसून आली.

प्रवीण पाटील- चिखलीकर व महाविकास आघाडीकडून आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. प्रवीण पाटील – चिखलीकर यांनी चांगली प्रचार यंत्रणा राबवली. परंतु आमदार शामसुंदर शिंदे यांनीही महाविकास आघाडीकडून विजयासाठी कंबर कसल्याचे दिसून आले.

यावेळी महाविकास आघाडीकडून आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवा संघटनेचे मनोहर धोंडे, मन्याड फाउंडेशनचे एकनाथ पवार, सुनील धोंडगे, नवनाथ चव्हाण, शरद पवार यांनी परिश्रम घेतले. तर खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्याकडून चिरंजीव प्रवीण पाटील- चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे – चिखलीकर या सर्वांनी मतदान केंद्रावर भेटी देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तर बहुजन वंचित व प्रहार जनशक्ती पक्षाकडून ज्ञानेश्वर गीते, बहिणाबाई बोलोरे, एकनाथ कांबळे यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण तीन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. माळाकोळी ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण 285 मतदारपैकी 281 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात 243 मतदारांपैकी 240 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT