Nanded News: urdughar nor shadi khana stuck in the vortex of controversy
फजल मुल्ला
देगलूर : नगर परिषदेने 59 लाख रूपये खर्चुन अनेक वर्षांपासून रखडलेल्या हजरत जियाउद्दीन रफाई शादिखान्याचे काम पाच वर्षांपूर्वी कसेबसे पुर्ण झाल्यावर तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही झाले मात्र उद्घाटनानंतर नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे लिलाव रखडल्याने शहरातील गोरगरीब नागरिकांना शुभ व मंगल कार्यासाठी शादिखान्यातील असुविधांचा सामना करत वंचित रहावे लागत आहे. तर सतत पाच वर्षांपासून नगर परिषदेने शादिखान्या कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे एकीकडे शादिखान्याची प्रचंड तोडफोड होऊन दुर्दशा होत आहे तर सभोवती वाढलेले घाणीचे साम्राज्य आणि काटेरी वृक्षांचे कुंपण हे दुर्लक्षतेचे प्रतिक बनले आहे-
तर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या सत्ताधऱ्यांनी शादीखान्याला उर्दूधर अभ्यासिका बनविणार असा मानस बाळगला होता तर विरोधी पक्षाने जोरदार विरोध करत शादीखान्याचाच विकास करून सुविधा उपलब्ध करून द्या आणि अन्यत्र उर्दूघर बनवा अशी जोरदार मागणी केली होती त्यावरून शादिखान्याचे उर्दूघर होणार की शादी खानाच विकसित होणार यावरून मुस्लिम नागरीकांत मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तर नगर पालीकेची नवीन कांऊसिल येऊन सात महिन्याचा कालावधी लोटूनही कोणताही निर्णय झला नाही त्यामुळे शादिखान्याची प्रचंड दुर्दशा झाल्याचे दिसून येते त्यामुळे अल्पसंख्याक नागरीकांतून सदरील इमारत कोणत्यातरी लोकोपयोगात आणण्याची मागणी केली जात आहे. शहरातील नरंगल रस्त्यावर गट नंबर १३७ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुस्लिम समाजासाठी नगरपरिषदे मार्फत महाराष्ट्र नगरोत्थान योजनेंतर्गत ५९ लाख १० हजार रूपयांचा निधी खर्चुन अनेक वर्ष रखडलेला हजरत जिआऊद्दिन रफाई शादिखाना अखेर पुर्ण झाल्यावर सन २०२१ मध्ये तत्कालीन बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते थाटामाटात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
मात्र उद्घाटनानंतर नगरपरिषदेला शादिखान्याचा लिलाव करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून वेळच मिळाला नाही, त्यामुळे गेली पाच वर्षांपासून शादिखाना फक्त शोभेची वस्तू म्हणून गणली जात आहे तर सध्या शादिखाना रिकामी असल्याने थुकीच्या पिचकाऱ्यासह प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच खिडक्यांची प्रचंड तोडफोड झाली आहे तर दुसरीकडे नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे शादिखान्याच्या सभोवती घाणीचे साम्राज्य व परिसरात काटेरी वृक्षांचे कुंपण झाले आहे तर शादिखान्यातील अनेक वस्तुंची तोडफोड प्रचंड प्रमाणात होत आहे.
त्यामुळे उद्घाटन होवूनही गेली पाच वर्षांपासून नगरपरिषदेने सर्वसाधारण जनतेसाठी उपलब्ध न करून दिल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांना शादिखान्या अभावी नाइलाजास्तव पाऊस, ऊन व वाऱ्यातच लग्न समारंभ व इतर मंगल समारंभासाठी आपल्या घरासमोर किंवा महागड्या मंगल कार्यालयात पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे त्वरित शादिखाना सर्व सुविधांनी युक्त जनतेला उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून शहरातील अल्पसंख्यांक जनतेतून केली जात होती मात्र न. पा. त्याकडे