lightning strike Pudhari
नांदेड

Nanded News : उमरीत वीज कोसळून १ गाय अन् ८ शेळ्या दगावल्या

बोळसा (बु) येथील दुर्दैवी घटना; शासनाने आर्थिक मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उमरी : तालुक्यात सोमवारी (दि.१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान उमरी तालुक्यातील मौजे बोळसा (बु.) येथील शेतकरी संतोष बाळोजी चिकटवाड यांच्या गट क्रमांक २६ मधील शेतात वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या आठ शेळ्या व एक गाय दगावली.

अत्यंत गरिबी परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT