Nanded News : गोमांस विक्री करणाऱ्या १२ जणांवर पोलिसांची कारवाई File photo
नांदेड

Nanded News : गोमांस विक्री करणाऱ्या १२ जणांवर पोलिसांची कारवाई

एक लाख ३२ हजारांचे गोमांस जप्त

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Police take action against 12 people selling beef

नांदेड, पुढारी वृत्तसेवा देगलूर शहरातील गुम्मडवेस भागात काहीजण गोवंशाची मांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीसांनी छापा टाकून गोमांस विक्री करणाऱ्या १२ जणांकडून तब्बल एक लाख ३२ हजारांचा गोमांस जप्त केला. या प्रकरणी १२ जणां विरोधात देगलूर पोलिस ठाण्यात रविवारी (दि. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देगलूरचे पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांना गुप्त माहिती या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देगलूरचे पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांना गुप्त माहिती मिळाली की, शहरातील गुम्मडबेस मध्ये अवैधरीत्या गोमांस विक्री केली जात आहे.

त्यामुळे त्यांनी पथकासह गुम्मडबेस येथे जाऊन गोमांस विक्री करणाऱ्या अब्बुबकर सिध्दी मोहम्मद मौलाना कुरेशी, शेख इमरान कुरेशी, शेख बिलाल वाहेद कुरेशी, फयुम कुरेशी मोहम्मद कुरेशी, निजाम कुरेशी जमील कुरेशी, गफार कुरेशी अशा १२ जणांना ताब्यात घेतले. हसन कुरेशी, शेख रईस अक्तर कुरेशी, अंजु शेख अजीम शेख, शेख समीर शेख आसीफ कुरेशी, जमील महेबूबसाब कुरेशी, शेख तबरेज शेख जमील कुरेशी, गफार कुरेशी अशा १२ जणांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT