Nanded News : उन्हाळ्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा : आ. केराम file photo
नांदेड

Nanded News : उन्हाळ्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा : आ. केराम

संभाव्य टंचाईचा आढावा; पाणीस्रोताची स्थिती तपासून उपाययोजना राबविण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Plan ahead to prevent water scarcity during the summer, urges MLA Keram

किनवट, पुढारी वृत्तसेवा यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने आगामी उन्हाळ्यात किनवट तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. ही परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच उपलब्ध जलस्रोतांची स्थिती तपासून नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त करणे, आवश्यक ठिकाणी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था उभी करणे आणि गावनिहाय कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश आमदार भीमराव केराम यांनी दिले.

जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०२७ या दोन टप्प्यांत उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या वतीने श्री साई मंगल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत संभाव्य टंचाईग्रस्त गावे, वाड्या-वस्त्या विहिरी, विंधन विहिरी, हातपंप तसेच नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून गावांतील पाणी उपलब्धतेची माहिती घेत टंचाई निवारणासाठी आवश्यक कामांचा आढावा घेण्यात आला.

नादुरुस्त हातपंप दुरुस्त करणे, गरजेनुसार नवीन विंधन विहिरी घेणे, नळ पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी दूर करणे, विहिरींचा गाळ काढणे आणि पाणी टंचाई आढावा बैठक मध्यमंत्री नमृध्द पंचायतराज अभियान २.० आवश्यकतेनुसार खासगी विहिरी अधिग्रहित करणे या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याबाबतही नियोजन करण्यास सांगण्यात आले.

पिण्याच्या पाण्याबरोबरच शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील पाणी उपलब्धतेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, उन्हाळ्यात चारा टंचाई टाळण्यासाठी चारा उपलब्धता आणि लागवडीचे नियोजन करण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे स्रोत, उपलब्ध साठा आणि संभाव्य टंचाईची वस्तुस्थिती पंचायत समितीकडे वेळेत सादर करावी. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आराखड्यातील उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आमदार केराम यांनी व्यक्त केली.

बैठकीस तहसीलदार शारदा चोंडेकर, नायब तहसीलदार रफिक मोहम्मद, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT