नांदेड

Nanded News | निसर्गाचा चमत्कार! पांगरा येथे गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!

नांदेड तालुक्यातील पांगरा गावातील दुर्मीळ घटना, वासरे पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

नवीन नांदेड : नांदेड तालुक्यातील पांगरा गावात रविवारी (दि. १२ जुलै) एक दुर्मीळ आणि आनंददायी घटना घडली. गावाचे सरपंच हनुमंत घोगरे यांच्या निवासस्थानी असलेल्या गाईने एकाच वेळी दोन निरोगी व ठणठणीत वासरांना जन्म दिला. या अनोख्या घटनेची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी गाय व वासरांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.

पांगरा गावात प्रथमच गाईने दोन वासरांना जन्म दिल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी रात्री उशिरापर्यंत घोगरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन दोन्ही वासरांना पाहायला येत होते

दोन्ही वासरे आणि गाय पूर्णपणे निरोगी असल्याची माहिती मिळाली असून या दुर्मीळ घटनेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावभर या घटनेची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT