Nanded News : Nine cases of forced theft including chain theft busted in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणारे साखळीचोर (चेन स्नेचर) आणि शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), इतवारा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल नऊ गंभीर गुन्ह्यांची उकल केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६ लाख ७४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर व परिसरात वाढत्या साखळीचोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी गुन्हे शोध पथकांना तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार इतवारा, शिवाजीनगर, भाग्यनगर, सोनखेड, नांदेड ग्रामीण व विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या नांदेडमध्ये साखळी चोरीसह जबरी चोरीच्या नऊ गुन्ह्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
घटनांचा समांतर तपास सुरू करण्यात आला. संशयित भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या विश्लेषणावरून (सायबर सेल) पोलीस पथकाने आरोपींचा माग काढला. पोलिसांनी आरोपी योगेश नरसिंग दासेवाड (वय १८, रा. चौफाळा, नांदेड), अरबाजखान ऊर्फ अब्बु आरेफखान पठाण (वय ३०, रा. फारुखनगर), गणेश राजाराम हिवराळे (वय २८, रा. नुरी चौक) व शिवाजी पुंडलिक डुबुकवाड (वय २५, रा. नुरी चौक) यांच्यासह अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले.
आरोपींनी शक्तीनगर, चैतन्यनगर, पिरबुऱ्हाणनगर, श्रीनगर, वाघळा आणि अण्णाभाऊ साठे चौक परिसरात महिलांना गाठून मंगळसूत्र व सोन्याचे मणी हिसकावल्याची कबुली दिली. तसेच विमानतळ रस्ता परिसरात एका दुचाकीस्वाराला खंजरचा धाक दाखवून जप्त केलेला मुद्देमाल सोन्याचे दागिने : मणी मंगळसूत्र, शॉर्ट गंठण, आंध्रा मंगळसूत्र व सोन्याचे मणी (सुमारे ३.५ लाख रुपये मूल्य).
स्मार्टफोन : व्हीव्हीओ (VIVO) कंपनीचे ४ मोबाईल (अंदाजे किंमत ₹९५,०००/-). वाहने व रोकड : गुन्ह्यात वापरलेली व चोरी केलेली 'हिरो स्प्लेंडर' दुचाकी (MH 26 CG 9207) आणि रोख रक्कम. एकूण जप्ती : ₹६,७४,०७५/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
लुटल्याचा गुन्हाही या तपासात उघडकीस आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, इतवाराचे पोनि. रामेश्वर खनाळ, शिवाजीनगरचे पोनि. राजेश पुरी, पोउपनि. साईनाथ पुयड, प्रवीण आगलावे व त्यांच्या अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.