मृत मुलगा गणेश ताडेवाड, वडील रामलू इरामलू ताडेवाड  
नांदेड

Nanded News | मुलगा गेल्याच्या दुखःत वडिलांनीही सोडला प्राण : बाप लेकावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार....!

सिबदरा गावातील घटना : बाप लेकाच्या निधनाने गावात हळहळ

Namdev Gharal

हिमायतनगर : एकीकडे अल्पशा आजारामुळे आपल्या मुलाचा झालेल्या मृत्युचे दु:ख प्रचंड असतांना हे दु:ख सहन न झाल्याने मुलांच्या अंत्यविधी दिवशी सकाळीच बापानेही प्राण सोडला. ही मनाला चटका लावणारी घटना सिबदरा गावात घडली आहे.एकाच दिवशी बाप लेकावर अंत्यसंस्कार करतांना उपस्थितीतांना अश्रू अनावर झाले होते.

हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा गावातील रहिवासी असलेले गणेश रामलू ताडेवाड वय (56) यांचे अल्पशा आजाराने दि.9 फेब्रुवारी रोजी दुपारी दुखःद निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तिन भाऊ तिन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.गणेश ताडेवाड हे ग्रामीण भागात मिस्त्री काम करीत असल्याने पंचक्रोशीत त्यांनी चांगली ओळख निर्माण केली होती. एक चांगला कामाशी प्रामाणिक असलेला व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या कामातून ओळख करून अनेकांची मने जिंकली आहेत.

त्यांच्यावर 10 रोजी बोरगडी रस्त्यावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. ही बातमी गणेश यांचा मुलगा आजोबांना सांगण्यासाठी व त्‍यांना अंत्‍यसंस्कारासाठी आणन्यासाठी गेला होता. पण ही बातमी कळताच मुलगा गेल्याच दुःख बापाला झाले आणि या दुःखात आपलाही प्राण सोडला. मुलाच्या अंत्यविधीच्या वेळ आणि बापाच्या निधनाची वार्ता आली पुन्हा ताडेवाड कुटुंबार बाप लेकाच्या दुःखाचं सावट पसरले. मुलावर हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर लगेच बापावर सिबदरा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी बाप लेकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT