अमेरिकेचे माजी आरोग्य सल्लागार डॉ. अतुल गावंडे 
नांदेड

Nanded News | अमेरिकेचे माजी आरोग्य सल्लागार डॉ. अतुल गावंडे १० मार्चला उमरखेडमध्ये; मातृभूमीशी जपले जिव्हाळ्याचे नाते

मातोश्री, कै. डॉ. सुशीलाताई गावंडे यांचा अस्थिकलश ठेवणार गावंडे महाविद्यालयात दर्शनासाठी

पुढारी वृत्तसेवा

​उमरखेड : अमेरिकेचे माजी आरोग्य सल्लागार, प्रख्यात शस्त्रक्रियातज्ज्ञ आणि जगप्रसिद्ध लेखक डॉ. अतुल आत्माराम गावंडे १० मार्च रोजी उमरखेडच्या दौऱ्यावर येत आहेत. आपल्या मातोश्री, कै. डॉ. सुशीलाताई गावंडे यांचा अस्थिकलश घेऊन ते स्थानिक गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात उपस्थित राहणार असून, या निमित्ताने एका जागतिक व्यक्तिमत्त्वाचा आपल्या मुळांशी असलेला ओढा पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.

​अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आणि प्रभावशाली विचारवंत म्हणून ओळखले जाणारे डॉ. अतुल गावंडे, त्यांच्या भगिनी ॲड. सुमिता गावंडे यांच्यासह आपल्या आईच्या अस्थींचे दर्शन आणि पूजन करण्यासाठी उमरखेडला येत आहेत. गावंडे परिवाराने या महाविद्यालयाला नेहमीच आपले 'तिसरे अपत्य' मानले असून, संस्थेच्या जडणघडणीत डॉ. अतुल यांच्या माता-पित्यांचे मोठे योगदान राहिले आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी सुशीलाताईंच्या निधनानंतर डॉ. अतुल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेषत्वाने भारतात येत आहेत.

या भेटीनिमित्त महाविद्यालयात अस्थिकलश दर्शन आणि शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या डॉ. अतुल गावंडे यांची ही भेट असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT