UDID Registration Pudhari News Network
नांदेड

Nanded News | UDID प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांगांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : अस्थिव्यंग व अंध दिव्यांग बांधवांना युडीआयडी ऑनलाइन प्रमाणपत्र मिळण्यात विलंब होत आहे. या निषेधार्थ सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) ग्रामीण रुग्णालय, नायगाव येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, नांदेड जिल्ह्याच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून अनेक दिव्यांग लाभार्थी युडीआयडी ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करत आहेत. काही लाभार्थ्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीत तफावत आल्याने त्यांची प्रकरणेही प्रलंबित आहेत. संबंधित प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेण्यात दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नायगाव व बिलोली तालुक्यातील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत किंवा टक्केवारी दुरुस्तीचे प्रस्ताव ऑनलाइन सादर केले आहेत. त्यांनी सोमवारच्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे सांगवीकर, जिल्हा संपर्कप्रमुख राजेश बेळगे, जिल्हा सचिव मारोती मंगरुळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत (चा. दु.) आंबटवाड, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कागडे, नायगाव तालुकाध्यक्ष साईनाथ बोईनवाड, बिलोली तालुकाध्यक्ष हनुमंत सीताफुले, बिलोली महिला अध्यक्ष शांताबाई चितले तसेच नायगाव तालुका उपाध्यक्ष माधव कोसबे यांनी केले आहे.तरी सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य करावे, असेही संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT