Nanded News: Decline in Results; Girls are ahead of boys in 12th exam
नांदेड : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. नांदेड जिल्ह्याचा एकूण निकाल ७७.७० टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या कडक कॉपीमुक्त अभियानाचा हा परिणाम मानला जात आहे. निकालात घट झाली असली वर्चस्व गाजवले आहे. तरी, यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींनीच मुलींची सरस कामगिरी निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास मुलींचे यश लक्षणीय आहे: मुलींचा निकाल ८४.६१%, मुलांचा निकाल ७१.७४% लागला आहे.
तिन्ही प्रमुख शाखांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. कला शाखेचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागला आहे. इतर तालुक्यांची स्थिती अशी : बिलोली ८८.९४%, उमरीः ८६.६८%, नांदेडः ८३.७१, मुखेडः ८२.७२, किनवटः ७९.५०, लोहा: ६५.२६%. जिल्हा प्रशासनाने नेमलेली विशेष पथके आणि शिक्षकांवरील कारवाईच्या घडाक्यामुळे परीक्षेतील पारदर्शकता वाढली आहे. निकालाची टक्केवारी घसरली असली, तरी हा निकाल विद्यार्थ्यांच्या खऱ्या गुणवत्तेचे दर्शन घडवणारा असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी निकाल
(टक्केवारी) विज्ञान २१,०३३, कला ८,२२५. वाणिज्य १,८३६.
अर्धापूर ठरला किंग, कंधार गेला तळाला
जिल्ह्यात अर्धापूर तालुक्याने ९४ टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर मुदखेड ९१.४२ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, कॉपीमुक्तीच्या कारवाईचा सर्वाधिक फटका कंधार तालुक्याला बसला असून, सर्वात कमी (६३.१६%) निकाल या तालुक्याचा लागला आहे.
कॉपीमुक्तीसाठी प्रशासन कठोर
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आले. भरारी पथके आणि उपकेंद्रांवरील कडक निगराणीमुळे कॉपी बहादरांना चाप बसला. एकेकाळी निकालात आघाडीवर असणाऱ्या कंधारसारख्या तालुक्यांचा निकाल निचांकी स्तरावर पोहोचल्याने, प्रशासनाचा हा पॅटर्न यशस्वी ठरल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.