Nanded News : पूनम पवार यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांकडून आस्थापूर्वक चौकशी ! file photo
नांदेड

Nanded News : पूनम पवार यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांकडून आस्थापूर्वक चौकशी !

पूनम पवार यांना मागील काही महिन्यांपासून एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्याचे निदान झाल्यापासून त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Chief Minister makes a solicitous inquiry into Poonam Pawar’s health!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आमदार राजेश पवार यांच्या पत्नी व जिल्हा बँकेच्या संचालक पूनम पवार यांची मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांची आस्थेने विचारपूस केली.

पूनम पवार यांना मागील काही महिन्यांपासून एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्याचे निदान झाल्यापासून त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या या आजारासंबंधी पवार परिवाराने सुरुवातीला गुप्तता बाळगली होती. परंतु काही दिवसांपूर्वी स्वतः पूनम पवार यांनी समाजमाध्यमांतून आपला आजार आणि त्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत आपल्या हितचिंतकांना अवगत केले होते.

दरम्यान, त्यांच्या आजारपणाची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पवार दाम्पत्याने ही माहित समाजमाध्यमांतून जाहीर केली. मुख्यमंत्र्यांची भेट अनपेक्षित होती परंतु कठीण काळात त्यांच्याकडून मिळालेला मायेचा आधान आयुष्यभर स्मरणात राहील, असे आ. पवार यांनी त्यावर म्हटले आहे.

रुग्णालयातील भेटीदरम्यान फडणवीस आमच्यासाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, तर आमच्या कुटुंबातील एक वडीलधार भेटीसाठी आल्याची भावना निर्माण झाली. तसेच पूनम पवारांच्य आजारामुळे आमचे संपूर्ण कुटुंब काहीशा कठीण काळातून जात आहे अशावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक हितचितकांनी दाखवलेली आपुलक आणि त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आमच्यासाठी शब्दांच्या पलीकडे असल्याची कृतज्ञ भावना आ. पवार यांनी व्यक्त केलीमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पवार दाम्पत्याने ही माहित समाजमाध्यमांतून जाहीर केली. मुख्यमंत्र्यांची भेट अनपेक्षित होती परंतु कठीण काळात त्यांच्याकडून मिळालेला मायेचा आधान आयुष्यभर स्मरणात राहील, असे आ. पवार यांनी त्यावर म्हटले आहे.

रुग्णालयातील भेटीदरम्यान फडणवीस आमच्यासाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, तर आमच्या कुटुंबातील एक वडीलधार भेटीसाठी आल्याची भावना निर्माण झाली. तसेच पूनम पवारांच्या आजारामुळे आमचे संपूर्ण कुटुंब काहीशा कठीण काळातून जात आहे अशावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक हितचितकांनी दाखवलेली आपुलक आणि त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आमच्यासाठी शब्दांच्य पलीकडे असल्याची कृतज्ञ भावना आ. पवार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT