नांदेड

Nanded News | बारूळ येथे श्री महादेव लिंग पुनर्प्राणप्रतिष्ठा सोहळा

Barul Mahadev Temple| नंदीचा लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार

पुढारी वृत्तसेवा

कंधार : शतकानुशतके ग्रामदैवत म्हणून पूजिले जाणारे आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या बारूळ येथील जागृत देवस्थान सिंहासनावरील श्री महादेव लिंगाची पुनर्प्राणप्रतिष्ठा व भव्य दिव्य नंदीच्या लोकार्पणाचा पावन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. पंचक्रोशीतील कानाकोपऱ्यात 'हर हर महादेव'च्या जयघोषात श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अनुपम संगम अनुभवायला मिळणार आहे.

या दिव्य सोहळ्यास गुरूवाचार्य श्री ष.ब्र.प्र. १०८ डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, गणाचार्य मठ संस्थान मुखेड, श्री १०८ प.पु. महंत यदुबन महाराज कोलंबीकर, दत्त मठ संस्थान कोलंबी (नायगाव) तसेच प.पू. संत श्री नामदेव महाराज बारूळकर, मठ संस्थान बारूळ यांची पावन उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या सान्निध्यात वैदिक विद्वानांच्या मंत्रघोषात धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत शिवपुराणचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांच्या अमृतमय वाणीतील शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. शिवभक्तांसाठी ही कथा आत्मिक समाधान व आध्यात्मिक उन्नती देणारी ठरणार आहे.

६ फेब्रुवारी रोजी होम-हवन, श्री महादेव लिंगाची विधीवत पुनर्प्राणप्रतिष्ठा तसेच भव्य-दिव्य नंदीचा लोकार्पण सोहळा गुरुवर्याच्या हस्ते संपन्न होणार आहे. या पावन प्रसंगानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांसाठी सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, बारूळ गावासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. या ऐतिहासिक व भक्तीमय सोळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळ, बारूळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT