Nanded Murder | हिमायतनगर - बोरगडी तांडा येथे पत्निचा गळा चिरुन खून : पतीनेही घेतला गळफास 
नांदेड

Nanded Murder | हिमायतनगर - बोरगडी तांडा येथे पत्निचा गळा चिरुन खून : पतीनेही घेतला गळफास

मेव्हण्याच्या लग्नाला आलेल्या जावयाने केले भीषण कृत्‍यः हृदयद्रावक घटनेने लग्नघरावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

हिमायतनगर : मेव्हण्याच्या लग्नासाठी आलेल्या जावयाने स्वतः च्या पत्नीचा रात्रीच्या वेळी गळा चिरून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली असून सकाळी शुध्दीवर आलेल्या पतीने झाडाला गळफास घेऊन स्वत जिवनयात्रा संपविली आहे. या पती पत्नीच्या मृत्यूची सुन्न ह्रदयद्रावक घटना बोरगडी तांडा गावात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे या घटनेचे मुख्य कारण अद्यापही समजू शकले नसली तरी स्थानिक पोलीसांकडून घटनेचा तपास सुरू आहे या तरूण पती पत्नीच्या मृत्यूमुळे पोटची तीन लेकर पोरकी झाली असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा नंबर 1 येते चुलत भावाच्या लग्नाच्या निमित्ताने पायल विनोद राठोड, वय( 35) पती विनोद रंगराव राठोड वय( 40)रा.धारजणी फुलवाडी तांडा ता.भोकर हे कुटुंब आपल्या तिन मुलाबाळांसह सासुरवाडीला आले होते. लग्न समारंभात दोघेही पती पत्नी हसत खेळत होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

अचानक पती विनोद राठोड यांच्या डोक्यात पत्नी बाबत चक्र फिरले आणि रातभर विचारात असलेल्या पतीने मंगळवार मध्यरात्री घरातील कुटुंब गाढ झोपेत असताना पत्निला घरा बाहेर बोलावून घरापासून काही अंतरावर काहीतरी सांगत घेऊन गेला आणि तिच्यावर पतीने चाकुने वार करून हत्या केली. रात्रीला दारूच्या नशेत हत्या केली सकाळची उजाड होताच फरार पतीने स्वतः धानोरा शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन स्वत आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली.

सदरील पत्नीची हत्या करून भितीपोटी स्वत गळफास लावून पतिने आत्महत्या केल्याचे घटना घडली पती पत्नीच्या ह्र्द्रावक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मयत या दोघाच्या पश्चात एक लहानसा मुलगा, दोन मुली परिवार आहे.सदरील घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैजंने ,पोलिस निरीक्षक अमोल भगत, पोलिस पाटील चक्रधर काईतवाड, निकेश राठोड, संदेश तुळशे, सरपंच, पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.वृत्त लिहीपर्यंत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगत यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT