नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका / Nanded Waghala City Municipal Corporation Pudhari News Network
नांदेड

Nanded Municipal Election : मनपा निवडणुकीसाठी आरक्षण (महिला) सोडत जाहीर

20 प्रभागांत 41 महिला होणार नगरसेवक प्रभाग 20 मध्ये महिलांच्या तीन जागा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड- वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी प्रत्येक प्रभागांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (महिला) जागांची सोडत (दि.११) डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये काढण्यात आली. महिलांच्या काही जागा या अगोदरच निश्चित केलेल्या असल्यामुळे, अनेकांचा मात्र हिरमोड झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

२० मे रोजी महापालिकेच्या प्रभागांतील जागा आरक्षित करण्याचे नियम प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याप्रमाणे आरक्षणाची सोडत मंगळवारी (दि.11) रोजी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू आदींची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेत चार सदस्यीय १९ आणि पाच सदस्यीय एक असे एकूण २० प्रभाग आणि ८१ जागा आहेत. यामध्ये अनुसुचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २१ आणि खुल्या प्रवर्गासाठी ४३ जागा असणार आहेत.

प्रभाग २० मध्ये महिलांच्या तीन जागा

पाच सदस्यीय प्रभाग क्र. २० मध्ये अ जागा अनुसूचित जाती, ब-क जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर ड व इ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोडल्या आहेत. यातील तीन जागा महिलांसाठी दिल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाची दोन पैकी पहिली जागा संबंधित प्रवर्गाच्या महिलेसाठी सोडत देण्यात आली आहे.

प्रभागनिहाय आरक्षिक जागांचा तपशील असा

आरक्षित जागांची संख्या अशी...

  • अनुसूचित जाती -१५ पैकी ८ महिला

  • अनुसूचित जमाती-०२ पैकी १ महिला

  • ना. मा. प्रवर्ग - २१ पैकी ११ महिला

  • सर्वसाधारण ४३ पैकी २१ महिला

  • एकूण - ८१ पैकी ४१ महिला

ओबीसीची एक जागा खुल्या प्रवर्गाला

  • मागील निवडणुकीत ८१ पैकी ४२ जागा महिलांसाठी सोडण्यात

  • आल्या होत्या. परंतु, निवडणूक आयोगाने यंदा ओबीसी आर-

  • क्षणासाठी ०.९९ पर्यंतच्या अपुर्णांकास शून्य महत्त्व दिल्यामुळे

  • जागांसाठी येणाऱ्या २१.८७ टक्के जागेतील ०.८७ टक्केच्या आर-

  • क्षणाचा लाभ ओबीसींना मिळू शकणार नाही. त्यामुळे ओबीसींसाठी

  • यंदा २२ ऐवजी २१ जागा सुटल्या आहेत. ओबीसींची कमी झालेली

  • ही जागा खुल्या प्रवर्गाकडे वळविण्यात येणार असल्याने खुल्या

  • प्रवर्गाला एक अतिरिक्त जागा मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT