Mukhed Grocery Shop Fire Pudhari
नांदेड

Shop Fire Nanded | शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग; दहा लाखांचे नुकसान

मुखेड तालुक्यातील तुपदाळ खुर्द येथे मध्यरात्रीची घटना; दुकानातील माल जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

Mukhed Grocery Shop Fire

मुखेड : मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत किराणा दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला. या आगीत अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने दुकानात त्यावेळी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

मुखेड तालुक्यातील तुपदाळ खुर्द येथे रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास तुकाराम पांडुरंग दुनाटे यांच्या किराणा दुकानाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील किराणा माल जळून पूर्णपणे खाक झाला.

घटनेची माहिती तहसील कार्यालयाला देण्यात आल्यानंतर जाहूर येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. गावातील पंचांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणावर माल जळाल्याने दुनाटे यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली, त्यावेळी दुकानात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT