अल्‍पवयीन मुलीचा लैंगिक छळ File Photo
नांदेड

नांदेडः अल्‍पवयीन मुलीचा लैंगिक छळ, आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Nadend Crime News | आरोपीकडून पिडीतेस जीवे मारण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

शंकरनगर : अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्‍या प्रकरणी एका आरोपीवर रामतीर्थ पोलिस ठाण्यात पोस्‍कोंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. तसेच संबंधित आरोपीच्या आई व बहीणीने फिर्यादीच्या आई वडीलास लाथा बुक्यानी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच अॅसीड टाकून पिडीतेस जिवंत मारण्याची धमकी दिल्याची घटना नायगाव तालुक्यातील नरसी येथे घडली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अरबाज अजिज शेख, ममताज, तब्बु रा.सर्व शामनगर नरसी ता.नायगाव यांच्या विरोधात रामतीर्थ पोलीसात 2023 सह कलम 8,12 पोस्को प्रमाने कलम 3(1),(आर),(एस)3,(2),(व्ही.ए.) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरोपीस अद्याप अटक करण्यात आले नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रफिक चाँद व रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी घटनास्‍थळी भेट दीली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT