पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; ७ जण गजाआड pudhari photo
नांदेड

Nanded Crime : पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; ७ जण गजाआड

सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत लिंबगाव पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर यशस्वी छापा टाकला आहे. मौजे सुगाव शिवारातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळील एका शेतात सुरू असलेल्या 'अंदर-बाहर' जुगारावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण २,१२,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुगाव शिवारात झाडाखाली बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत घटनास्थळावरून ९,२०० रुपयांची रोख रक्कम, २३ हजार रुपये किमतीचे ४ अँड्रॉइड मोबाईल फोन, १ लाख ८० हजार रुपयांच्या ३ मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.​

अटक करण्यात आलेले आरोपी:

१) फेरोज खान रहिम खान, २) शेख अमिर शेख अहेमद, ३) इम्रान खान आयुब खान, ४) शेख महेबुबोद्दीन शेख अमिरोद्दीन, ५) बाजमेर खान गुलमेर खान, ६) शेख अफनान शेख इब्राहिम, ७) शेख कलीम शेख सलीम (सर्व रा. मिलगेट, नांदेड). ​या सर्व आरोपींविरुद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक बोधनकर, उपनिरीक्षक सय्यद, अंमलदार रामन बैनवाड, प्रमोद मोरे, अतुल सातारे, बालाजी तेलंग व प्रदीप गर्दनमारे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT