चार लाख लिटर दूध प्राशन करणार आज नांदेडकर file photo
नांदेड

चार लाख लिटर दूध प्राशन करणार आज नांदेडकर

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : कोजागरी पौर्णिमेनिमित्त बुधवारी (दि. १६) नांदेड शहरात ब्रेडेड व दूध उत्पादकांचे मिळून सुमारे ४ लाख लिटर दुधाची मागणी नोंदवण्यात आली असून नियमित लागणाऱ्या दुधासह हा आकडा आहे. नियमित दुधाच्या तुलनेत दुप्पट दूध अधिक नोंदवण्यात आले आहे. ब्रेडेड दूध सरासरी ६५ रुपये लिटर व डेअरी व वरव्याच्या माध्यमातून विक्री होणारे खुले दूध सरासरी ६० रुपये लिटर गृहित धरता बुधवारी सुमारे २.५० कोटी रुपयांची उलाढाल होणार असून दूध तयार करण्यासाठी लागणारा सुकामेवा वेगळा.

अश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा तसेच शरद पौर्णिमा असेही संबोधतात. बुधवारी (दि. १६) हा दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आटवलेल्या दुधाचे महत्त्व असून है दूद्ध चंद्रप्रकाशात ठेवून प्राशन करावे, अशी मान्यता आहे. भारतीय हिंदू संस्कृतीत या दिवसाला वेगळे महत्व आहे. तर कृषी संस्कृतीतही हा दिवस पवित्र मानला जातो. पौर्णिमेला माणिकेधारी अर्थात मोती तयार करणारी असेही संबोधले जाते. या दिवशी साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि को-जागर्ति म्हणजे कोण जागत आहे अर्थात सजग आहे,

ज्ञानप्राप्तीसाठी आतूर आहे, असे विचारत असते, अशी धारणा आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते.

चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते. याच दिवशी वैदिक परंपरेतील देवता अश्वनीकुमार यांची प्रार्थना करुन उत्तम आरोग्याची कामना केली जाते. नांदेड शहरात नॅचरल कंपनीच्या दोन डिलरकडे मिळून दररोज सुमारे ९ हजार लिटर दूध येते. कोजागरीनिमित्त त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली असून उद्या सुमारे १७ हजार लिटर दूध येईल, याशिवाय अमूलचे दूध सुद्धा नांदेडमध्ये येते आहे.

उद्या हे दूध सुमारे २ ते अडीच हजार लिटर तर सोनाईचे सुद्धा सुमारे अडीच हजार लिटर दूध नोंदणी झाले आहे. या प्रकारे सर्व प्रकारच्या ब्रेडचे मिळून सुमारे १ लाख लिटर दूध उद्या विक्री होईल. याशिवाय डेअरी व वरवेवाले असे मिळून सुमारे ३ लाख लिटर दूध नांदेडमध्ये नोंदणी झाले आहे. अर्थात ब्रेडेड व खुल्या स्वरुपात विक्री होणारे असे मिळून सुमारे ४ लाख लिटर दूध कोजा- गरीच्या निमित्ताने नांदेडकर प्राशन करतील, असा अंदाज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT