Kinwat Illegal Sand Transport Pudhari
नांदेड

Illegal Sand Smuggling | किनवटजवळ अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाहन आणि रेती असा एकूण सुमारे २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Kinwat Illegal Sand Transport

किनवट : महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत किनवट शहरालगत रेतीची वाहतूक करणारे एक हायवा वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी वाहनचालकासह तिघांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ८) पहाटे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान एका हायवा वाहनातून रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहन आणि त्यामधील रेती असा एकूण सुमारे २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस), जमीन महसूल अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे पुढील तपास करीत आहेत. तसेच रेती वाहतुकीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि इतर बाबींचीही सखोल पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT