फुलवळ :कंधार तालुक्यातील फुलवळ येथे शनिवारी (दि. १३) पहाटे ४ वाजेच्या सुमारास अवैध रेतीची वाहतूक करणारा एक हायवा टिप्पर पकडण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले, उप विभागीय अधिकारी श्री. विलास नरवटे, आणि तहसीलदार श्री. रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीमती रेखा चामनर यांच्या नेतृत्वाखालील पथक क्र. ३ ने ही कारवाई केली.
नायब तहसीलदार रेखा चामनर यांच्या पथकात ग्राम महसूल अधिकारी कैलास मोरे, शिपाई शिवराज लघुळे, आणि वाहन चालक मिर्झा समीर बेग यांचा समावेश होता. या पथकाने पहाटे ४ वाजताच्या दरम्यान एम एच १५ एफ व्ही ६३९० क्रमांकाचा हायवा टिप्पर अवैध वाळू वाहतूक करताना पकडला.
सदर गाडीचा चालक अनिल रामराव दर्शने (रा. मारतळा, ता. लोहा) याला घटनास्थळी चौकशी केली असता, त्याने वाहन मालकाचे नाव माहीत नसल्याचे सांगितले. हा विना परवाना वाळू वाहतूक करणारा हायवा मारतळा (ता. लोहा) येथून शिराढोण (ता. कंधार) येथे वाळू घेऊन जात असताना मौजे शिरढोण येथे पकडण्यात आला. पकडलेला हायवा टिप्पर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय, कंधार येथे जमा करण्यात आला आहे. सदर गाडीमध्ये अंदाजे ५.५ (साडे पाच) ब्रास वाळू असल्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार रेखा चामणर, ग्राम महसूल अधिकारी कैलास मोरे, शिपाई शिवराज लघुळे आणि वाहन चालक मिर्झा समीर बेग हे उपस्थित होते.