illegal sand mining 
नांदेड

Nanded llegal sand mining | आंतरगाव, वजीरगाव, बरबडा परिसरात दिवसा ढवळ्या अवैध वाळू उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष?

वाळूनफिया बनले वाळूचे भक्ष्य; कारवाईची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील आंतरगाव परिसरात दिवसा ढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. प्रशासनाने यापूर्वी काही ठिकाणी कारवाई करून वाळू माफियांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला असला, तरीही काही भागात हा अवैध व्यवसाय पुन्हा बोकाळल्याचे दिसून येत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, आंतरगाव परिसरातील नदीपात्रातून बोटी व पंपांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे हा उपसा रात्रीपुरता मर्यादित न राहता आता दिवसा ढवळ्याही सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. नदीपात्रातून काढलेली वाळू ट्रॅक्टर व डंपरच्या माध्यमातून विविध ठिकाणी वाहतूक केली जात असल्याने परिसरातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे.

यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काही ठिकाणी पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणारी साधने जप्त केली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा त्याच पद्धतीने वाळू उपसा सुरू झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या नायगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांच्या पदाचा तात्पुरता पदभार असल्याने येत्या काही दिवसांत हा पदभार बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या परिस्थितीचा फायदा घेत वाळू माफिया सक्रिय झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, आंतरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर तात्काळ कारवाई करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

प्रशासनकडून ठोस कारवाईची अपेक्षा

आंतरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाला तसेच नदीपात्राच्या रचनेला मोठा धोका निर्माण होत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकारामुळे महसूल व पोलिस यंत्रणेने संयुक्तपणे कारवाई करून वाळू माफियांवर लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT