होटाळा येथे दुष्काळग्रस्त शेतीची शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी 
नांदेड

Nanded News : होटाळा येथे दुष्काळग्रस्त शेतीची शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

अधिकाऱ्यांकडून पाहणी पूर्ण, पंचनाम्याकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : होटाळा (ता. नायगाव) परिसरात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिकांना आवश्यक पाणी मिळाले नसल्याने अनेक शेतांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपून वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास अधिकारी खैरनाथ, तलाठी मुंडे आणि कृषी सहाय्यक मुगावकर यांनी होटाळा परिसरातील दुष्काळग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी अधिकाऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट झाली असून लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राची शासन स्तरावर नोंद घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पाहणीदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत, पीकविमा आणि इतर दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT