मांडवी :- पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालीका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चंद्रपूर येथील होमगार्ड गेले होते. पुण्यावरून खाजगी ट्रव्हल्स या होमागार्डना घेवून चंद्रपूरला जात असतांना उनकेश्वर जवळ दुपारी 2:10 वा. भिषण अपघात झाला. यामध्ये 48 होमगार्ड सह 50 जण होते त्यातील 3 गंभीर जखमीला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
प्रत्यक्ष घटना स्थळावरुन घेतलेल्या माहिती नुसार नुकत्याच झालेल्या पुणे पिंपरी, चिंचवड महानगर पालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चंद्रपूर येथील पोलीस विभागाकडून 192 होमगार्ड गेले होते.
निवडणुक संपल्यानंतर चंद्रपूरचे होमकार्डला चार खाजगी ट्रव्हल्स घेऊन चंद्रपूर जात असतांना त्यातील ट्रव्हल्स क्रं. MH-03C,P 3279 ही माहूर ते उनकेश्वर मार्गावर उनकेश्वर जवळ सदर ट्रव्हल्सच्या पुढे कार जात होती. खड्डे पडलेल्या कलवट पुलाजवळ कार येताच चालकाने ब्रेक मारून वेग कमी केला, मात्र या कारच्या मागून सुसाट वेगात येत असलेल्या ट्रव्हल्स चालकाने अचानक ब्रेक मारले त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले व 50 प्रवाशी भरलेल्या ट्रव्हल्स वरिल चालकाचा ताबा सुटून 15 फुट खड्डयात पडून भिषण अपघात झाला.
आज दुपारी 2:10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे फौजदार गंगाधर गायकवाड, पोलीस मणिष ठाकरे, यांनी लगेच घटना स्थळावर धाव घेवून युद्धपातळीवर मदतकार्य करून जखमींवर उमरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले
त्यातील एक सुरज गेडाम वय 32 रा. परोटी जि. चंद्रपूर हा ट्रव्हल्स खाली दबून होता. तेव्हा घटनेचे गांभीर्य पाहून फौजदार गायकवाड यांनी विनाविलंब जेसीबी मशीन आणून त्याला गाड़ी खालून बाहेर काढले त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने यवतमाळ येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आहे. या दुर्घटनेत 50 प्रवाशी जखमी झाले असून ट्रव्हल्स चालक घटना स्थळावरुन फरार झाला आहे.