नांदेड : मासरेडमध्ये ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त file photo
नांदेड

नांदेड : मासरेडमध्ये ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे, जुगार, वाळूमाफिया, जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागांत (मासरेड) रविवारी मोहीम राबविण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Nanded: Goods worth 57 lakhs seized in mass raid

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे, जुगार, वाळूमाफिया, जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागांत (मासरेड) रविवारी मोहीम राबविण्यात आली. त्यात ५७ लाख ६७ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ७३ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे, अवैध जुगार खेळणारे, वाळू नांदेडमध्ये मासरेडमध्ये ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

व्यवसाय करणारे व अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी २१ फेब्रुवारी रोजी मास रेड केली. यावेळी जिल्ह्यात एकूण ७१ गुन्हे दाखल करून ७३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच ५७ लाख ६७हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत भोकरचे अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व जमादार आदींनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT