नांदेड : वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. Pudhari Photo
नांदेड

नांदेड : वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

१४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

हणेगाव : बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना वाळूची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर मरखेल पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये १४ लाख २४ हजार रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

काही वाळू माफिये ट्रॅक्टर मधून वाळूची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने मरखेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी वझर ते शिळवणी रस्त्यावर सापळा रचला. महात्मा बसेश्वर पुतळ्या समोरून वसंत तुकाराम कसले (रा.रामनगर ता. औराद) हा ट्रॅक्टर मधून वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना आढळला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तसेच चंद्रकांत शंकर पवार (रा. कमळ नगर, ता. औराद), सिमल उमाकांत सूर्यवंशी (रा. मुंगनाळ ता. औराद), इस्माईल कुरेशी (रा.औराद), सुभाष शंकर कासले (४५ रा. रामनगर ता. औराद), सुभाष लक्ष्मण कसले या यांच्यावरही विनापरवाना वाळूची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण १४ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील कारवाई सोमवार दि. १७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. एकाच दिवशी अशी धाडसी कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT