शेतकऱ्यांनी बँकेसमोर बेमुदत शांततापूर्ण सामूहिक उपोषण सुरू केले आहे Pudhari
नांदेड

Nanded Farmers Protest | शेतकऱ्यांचा संताप उफाळला! पीक कर्जासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर बेमुदत सामूहिक उपोषण सुरू

उमरी बाजार शाखेविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन; पीक कर्ज वितरणातील दिरंगाई दूर करण्यासह तीन प्रमुख मागण्या

पुढारी वृत्तसेवा

Umri Kharif Season Loan Delay

सरखणी : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा उमरी बाजार येथून खरीप हंगामातील पीक कर्ज मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि नवीन सातबारा धारकांनाही पीक कर्जाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी (दि. ५) पासून शेतकऱ्यांनी बँकेसमोर बेमुदत शांततापूर्ण सामूहिक उपोषण सुरू केले आहे.

खरीप हंगाम संपत आला तरी अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप पीक कर्ज मिळालेले नाही. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खते, औषधे तसेच इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असताना बँकेकडून कर्ज वितरणात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप करण्यास होत असलेली दिरंगाई थांबवून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नवीन पीक कर्ज मंजूर करावे.

नवीन सातबारा धारक शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे.

या आंदोलनात आशिष केवलसिंग नाईक, आकाश नारायण राठोड, बंटी पाटील जोमदे, श्रीनिवास येईलवाड, देवेंद्र कोवे, संजय रामसिंग राठोड, रवी मधुकर राठोड, संतोष फुलसिंग आडे, मनोज गेमसिंग आडे, सुदाम फुलसिंग आडे, रवी लालसिंग राठोड, विश्वनाथ लालसिंग राठोड, बाळू हेमा राठोड, योगेश रमेश राठोड, राहुल देवराव राठोड, अक्षय विनोद राठोड, यादव सांभा बोनतावार, नवीन नामदेव राठोड, स्नेहींत राठोड, बजरंग राठोड आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेऊन बँक प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी बँकेसमोर उपोषणात जाणार की आपल्या कुटुंबासोबत आनंदाने साजरी होणार? असा सवालही या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT