Nanded Farmer Loan Waiver  pudhari photo
नांदेड

Nanded Farmer Loan Waiver : नांदेड जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार शेतकरी कर्जमुक्त

५४ हजार ९१० शेतकऱ्यांना नव्याने ५५४ कोटींचा लाभ ; १,४१६ कोटी रुपयांची कर्जमाफी

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील एकूण १ लाख ७५ हजार १२८ शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १, हजार ४१६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असल्याची माहीती जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत ४ नोव्हेंबर रोजी नव्याने ५४ हजार ९१० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर ५५४ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आता दीड लाखांच्या पुढे गेली आहे.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जासाठी कमाल २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला गेला आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाआयटीने ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित केली होती. या प्रणालीवर जिल्ह्यातील बँकांनी २ लाख २४ हजार ८४७ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय छाननीनंतर २४ जुलै, ११ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या चार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २ हजार ७३ शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध झाली असून, त्यापैकी १ लाख ६४ हजार ८०६ शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. यापूर्वी १ लाख २ हजार २१८ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ८६१कोटी ५६ लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर नव्याने ४ नोव्हेंबर रोजी ५४ हजार ९१० शेतकऱ्यांना ५५४ कोटी ८४ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर असतांना आणि दुष्काळ परिस्थितीत जिल्ह्यातील दीड लक्ष शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत भाजपाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख व्यक्त केले आहे.

नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे-शाहूराज हिर

आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी केले आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. तसेच योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही आवाहन हिरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT