Kinwat Externed Accused Arrested Pudhari
नांदेड

Nanded Crime | हद्दपार आरोपी तलवारीसह किनवटमध्ये फिरताना पोलिसांच्या जाळ्यात

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन; महाराष्ट्र पोलीस अधिनियम व हत्यार कायद्यान्वये गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Kinwat Externed Accused Arrested

किनवट : नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आलेला एक आरोपी किनवट शहरात हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर किनवट पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३१) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास गंगानगर परिसरात विष्णू यादव मेटकर (वय २२, रा. गंगानगर, किनवट) हा हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात विष्णू मेटकर याला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, किनवट यांच्या आदेशानुसार नांदेड व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांतून नऊ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. असे असतानाही हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो किनवट शहरात वावरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईनंतर आरोपीला पोलिस बंदोबस्तात शहरातील प्रमुख मार्गांवरून पायी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या कारवाईची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.

याप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रशेखर केशवराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिलीप सिरमनवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT