Crime News pudhari photo
नांदेड

Nanded case - नांदेडमधील आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे !

नांदेडमधील आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे !

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रसाधनगृहात (शौचालय) गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास त्वरेने राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे देण्यात आला आहे. त्यानंतर या विभागाचे छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस अधीक्षक यशवंत काळे तातडीने येथे दाखल झाले.

सोमवारी नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या घडामोडींमुळे पोलीस यंत्रणेतील बहुतांश अधिकारी त्यामध्ये गुंतले होते. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंगल कार्यालयात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या कार्यक्रमानिमित्त ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तेथील बंदोबस्तामध्ये असताना दुपारी सव्वाचारच्या सुमारास या पोलीस ठाण्याच्या परिसरातील जुन्या इमारतीतल्या शौचालयात सुशील महाजन हैबते (वय ३८) या आरोपीने गळफास घेतल्याची माहिती पो. नि. अशोक जाधव यांना प्राप्त झाली.

गुन्हे अन्वेषण विश् CID महाराष्ट्र पोलीस या शौचालयातील खिडकीच्या गजास वायरची एक बाजू बांधून आरोपीने दुसरी बाजू गळ्याभोवती अडकवली. शौचालयातील बादली उलटी करून त्यावर तो उभा राहिला व नंतर त्याने बादली सरकावल्यामुळे फास आवळला गेला. त्यात तो मरण पावल्यामुळे एकच खळबळ उडाली.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तातडीने या ठाण्यास भेट देऊन संपूर्ण चौकशी केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनीही नंतर घटनास्थळास भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून हैबतेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात तत्पूर्वी सुशील हैबते यास त्याची पत्नी छाया हिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोमवारी पहाटेच ताब्यात घेतले होते. धनेगाव परिसरातील एका वीटभट्टीच्या परिसरात हा खून करण्यात आला होता. पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर सुशील हैबते याने आपला गुन्हा कबूलही केला होता.

सोमवारी दुपारी बॉम्बच्या अफवेमुळे नांदेडमधील सर्वच न्यायालयांचे काम ठप्प झाल्यामुळे सुशील हैबते यास न्यायालयात हजर करता आले नाही; पण या आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पावणेचारच्या सुमारास सुशील हैबते शौचालयात गेल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे काही व्यक्तींच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना अवगत केल्यावर सर्वांचीच धावपळ सुरू झाली.

नांदेडमध्ये अशाप्रकारची घटना प्रथमच घडली. हैबते यास शौचालयामध्ये गळफास घेण्यासाठी वायर कशी उपलब्ध झाली, हा या प्रकरणाच्या तपासातील महत्त्वाचा भाग झाला आहे. त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले का, याचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाला करावा लागणार आहे. मंगळवारी दुपारी आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तेथे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या प्रकरणातील हैबते दाम्पत्यामध्ये मागील काही महिन्यांपासून वाद निर्माण झाला होता. मधल्या काळात छाया हैबते ही पती सुशील यास सोडून घरातून निघून गेली होती. नंतर त्यांच्यातील वाद मिटवण्यात आला. २६ ऑक्टोबरपासून हे दोघेही धनेगाव येथील वीटभट्टीवर काम करत होते. छाया हैबते ही चार महिन्यांची गरोदर होती; परंतु त्यावरून सुशील याने तिच्याशी वाद घातला, संशय व्यक्त केला आणि २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्याने तिचा गळा दाबून खून केला. पती-पत्नीतल्या वादाचा शेवट दोघांच्या मृत्यूने झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT