नांदेड मनपाकडून अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्तात हातोडा pudhari photo
नांदेड

Nanded encroachment removal drive : नांदेड मनपाकडून अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्तात हातोडा

जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, काहीकाळ तणाव

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड महापालिकेने विविध भागांत रस्त्यावर अतिक्रमण करणार्य़ांवर आठ दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाघी रस्त्यावरील अतिक्रमण काढत असताना सोमवारी अतिक्रमण करणार्य़ांनी जेसीबी चालकाला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात मंगळवारी दि. 5 रोजी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मनपाने दुसर्य़ा दिवशीही वाघी रस्त्यावरील अतिक्रमण दोन जेसीबी लावून पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहरात वाढते अतिक्रमण ही डोकेदुखी ठरत असल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आठ दिवसांपासून विविध भागातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. सोमवारी वाघी रस्त्यावर अतिक्रमण काढत असताना अतिक्रमण करणार्य़ांत आणि महापालिकेच्या कर्मचार्य़ांत वादावादी झाली त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

अतिक्रमण करणार्य़ांनी चक्क जेसीबी चालकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत जेसीबी चालक गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर मंगळवारी महापालिकेचे कर्मचारी विशाल सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात शासकीय कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक्रमण काढण्यास विरोध झाल्याने मंगळवारी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी मोठा फौजफाटा घेऊन सकाळीच अतिक्रमणांवर हातोडा चालवला याला अतिक्रमण करणार्य़ांनी तीव्र विरोध केला, त्यामुळे महापालिकेचे पथक व अतिक्रमणकर्ते आमने सामने झाले त्यांच्यात वाद होत होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून वाघी रस्त्यावर छोटे मोठे व्यवसाय टाकून रस्ते गिळंकृत केले होते. महापालिकेने ठोस भूमिका घेत अतिक्रमण काढल्याने रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे आता वाहतुकीची समस्या कमी होणार आहे.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

आरोपींनी अतिक्रमण काढणाऱ्या जेसीबी चालकास अटकाव करून बेदम मारहाण केले तसेच मनपाचे कर्मचारी विशाल सोनकांबळे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर, फिर्यादीच्या खिशातील 2,500 रुपये जबरीने काढून नेले. या प्रकरणात विशाल सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद अतिक, शेख आयान, उमर खान (सर्व रा. खडकपुरा) व इतर 3 अनोळखी. अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही मुख्य आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पुढील तपास सपोनि लोंढे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT