Nanded District Bank  Pudhari
नांदेड

Nanded News : थकबाकीदारांच्या कर्जमाफीमुळे बँकांच्या चालू बाकीदारांत अस्वस्थता !

नांदेड जिल्ह्यातील चित्र : पुढील काळात वसुलीत अडचणी येण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

Nanded District Cooperative Bank Loan Waiver

संजीव कुळकर्णी

नांदेड : जिल्हा सहकारी तसेच अन्य वेगवेगळ्या बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना शासनाने केलेल्या कर्जमाफीचा राजकीय पातळीवरून मोठा गाजावाजा सुरू असताना दुसरीकडे याच बँकांच्या चालू बाकीदारांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येत आहे. थकबाकीदारांची रक्कम बँकांच्या खाती जमा होण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याहून प्रचंड असलेली 'चालू बाकी' पुढील काळात वसूल होणार का, असा प्रश्न बैंक अधिकाऱ्यांना पडला आहे.

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीच्या अभियानाच्या निमित्ताने भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळली. त्यांना 'लोकप्रिय', 'दूरदर्शी' अशी विशेषणे लावत खा. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे येथे अभिनंदन केले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शेतकऱ्यांना दोनवेळा कर्जमाफी देणारे फडणवीस हे एकमेव आहेत, असेही चव्हाण यांनी नमूद केले होते.

नांदेड जिल्ह्यात १५८२ गावांमधील सुमारे ९७हजार शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाली असून पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा सात-बारा कोरा होणार असल्याची माहिती सरकारी यंत्रणेने दिली. नांदेड जिल्हा बँकेच्या संदर्भान माहिती घेतली असता या बँकेने ११ हजार १६६ खातेदारांच्या थकबाकीची माहिती पोर्टलवर सादर केली होती. त्यातून बँकेला मुद्दल व व्याज मिळून १०० कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ७ हजार ४३४ शेतकऱ्यांची नावे जाहीर असून त्याद्वारे बँकेला पुढील काही दिवसांत ५५ मिळणार आहेत.

शासनाने वेगवेगळे निकष बदलून वरील योजना अंतिम केली. त्यामुळे बँकांवरील बोजा कमी झाल्याचे मानले जात असले, तरी शासनाच्या या निर्णयामुळे चालू बाकीदारांमध्ये अस्वस्थता दिसून येत असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नदिड जिल्हा बँकेच्या दप्तरी चालू बाकीदार शेतकऱ्यांची संख्या ४६ हजार असून त्यांच्याकडे ३२५ कोटी रूपयांचे कर्ज आहे. थकबाकीदारांना दिल्यामुळे चालू बाकीदारांकडील रक्कम वसूल करण्यात पुढील काळात अडचणी येऊ शकतात, अशी भीती जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मागील काही वर्षात नांदेड जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. गेल्या ३१ मार्चअखेर ही बैंक प्रदीर्घ कालावधीनंतर संचित तोट्यातून मुक्त झाली. एनपीएचे प्रमाण १५ टक्क्यांच्या खाली आणण्यात बैंक प्रशासनाला यश शासनाच्या योजनेमुळे या बँकेकडील शेतकरी थकबाकीतील ५० टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल होणार असली, तरी ज्या थकबाकी आहे त्यांच्याकडील उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. २०२०च्या आधीचे काही थकबाकीदार असून त्यांच्याकडे बँकेचे ८ कोटी रूपये अडकले आहेत.

शासन थकबाकीदारांच्या बाबतीत उदार होत असताना चालू बाकीदारांच्या बाबतीत मात्र कोणताही विचार झालेला नाही. नांदेड जिल्हा बँकेची ही बाकी ३२५ कोटी असून थकबाकीदारांना दिलेल्या माफीचा म्हणून चालू बाकीदार आता थकबाकीदार होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT