पादचाऱ्याला लुटणारे दोघे जेरबंद file photo
नांदेड

Nanded Crime News : पादचाऱ्याला लुटणारे दोघे जेरबंद

वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nanded Crime News: Two men who robbed a pedestrian arrested

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जुनामोंढा परिसरात पायी जात असलेल्या एका नागरिकाला अडवून जबरदस्तीने पैसे लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वजिराबाद गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. रणजोत्सिंग उर्फ बच्चूसिंग सतनामसिंग बावरी (वय २३) आणि सय्यद सलमान सय्यद बाबुमियाँ (वय २४, दोन्ही रा. सिडको, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कांदा मार्केट भागातील रहिवासी वाजीद अली अहेमद अली हे काल दुपारी जुनामोंढा ऑटोस्टॉपजवळ पायी जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी झटापट केली. आरोपींनी त्यांच्या शर्टच्या खिशातील १७०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले.

वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना सिडको परिसरातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून ती जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, बाजारपेठेत नागरिकांनी सावध राहावे व संशयास्पद हालचाली आढळल्यास '११२' वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT