Sand Pudhari
नांदेड

Nanded crime news | पैनगंगा नदी पात्रात मध्यरात्री रेती उपसा

Painganga River Sand Mining| दोन ट्रॅक्टरवर हिमायतनगर मंडल अधिकाऱ्यांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

हिमायतनगर : विदर्भ मराठवाड्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर रेती तस्करांनी उच्छाद मांडला आहे. महसूल प्रशासनाला चटका देत अवैध रेती उपसा सुरू असुन राजरोसपणे करीत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. गौण खनिज पथक प्रमुख मंडलाधिकारी चव्हाण यांनी मध्यरात्रीच जायमोक्यावर जाऊन रेती उपसा करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली. या घटनेमुळे रेती तस्करांत खळबळ उडाली आहे.

विदर्भ मराठवाड्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती उपसा करून बेभावाने रेती विक्री करून लाखो रुपये कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विदर्भातील रेती तस्करांकडून मराठवाड्यातील हद्दीमध्ये असलेल्या पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती उपसा करीत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. त्यानंतर मंडलाधिकाऱ्याने पळसपुर कोपरा घाटात 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध रेतीने भरलेले ट्रॅक्टर पकडला. यामध्ये विदर्भातील एक तर मराठवाड्यातील एक असे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आहेत.

तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोण खनिज पथक प्रमुख मड़ंळअधिकारी बि.एम.चव्हाण यांनी धाडस दाखवत मध्यरात्री रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली आहे. ग्राममहसुल अधिकारी भरणे महसुल सेवक भीमराव जाधव, योगेश आलेवाड, कर्मचारी आकाश बारकुल, योगेश आलेवाड पोलाीस कर्मचारी नागरगोजे यांना सोबत घेऊन कार्यवाही केली आहे. विदर्भातील रेती तस्करांनी आपली हद्द ओलांडून नये तसेच मराठवाड्यातील हद्दीतील उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल तसेच मराठवाड्यातील रेती उपसा करणाऱ्या तस्करांवर देखील महसूल प्रशासनाची नजर असुन उपविभागीय अधिकारी कांबळे, तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीची मोहिम सुरू आहे. महसूल प्रशासन कुणालाही सोडले जाणार नाही अशी माहिती मडंळाधिकारी बि.एम.चव्हाण यांनी बोलताना सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT