Nanded Crime News : अमृतसरच्या महिलेसह चौघांना बेड्या File Photo
नांदेड

Nanded Crime News : अमृतसरच्या महिलेसह चौघांना बेड्या

पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बुधवारी (दि.२०) मोठी कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

Nanded Crime News: Four people including a woman from Amritsar arrested

नांदेड, पुढारी वृत्तसेवा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बुधवारी (दि.२०) मोठी कारवाई केली. पंजाबमधील अमृतसर येथून अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुख्य महिला तस्करासह तिच्या तीन स्थानिक साथीदारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे ७२.०३ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिट्टा) व विनाक्रमांकाची अॅक्टिव्हा स्कूटी असा एकूण ४ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या पथकाला अमृतसरची महिला न्यायालय ते हिंगोली गेट बायपास रोडवर थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.

पोलिसांनी बायपास रोडवर सापळा रचून छापा टाकला व संशयास्पद स्थितीत थांबलेल्या महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये हा साठा सापडला. या प्रकरणी मुख्य महिला तस्कर राजविंदर कौर जरनजितसिंग महाल (३८, रा. अमृतसर, पंजाब), गुरमुखसिंग ऊर्फ गुरी सेवकसिंग गिल (२८, रा. शहीदपुरा, नांदेड), अमनप्रितसिंग ऊर्फ मनी जगजीतसिंग बेदी (३०, रा. गुरुद्वारा गेट नं. २, नांदेड) व जनार्धन ऊर्फ पटेल गोविंदराव सोनटक्के (३१, रा. ब्राह्मणवाडा, नांदेड) यांना अटक केली आहे.

घटनास्थळावरून दोघांना पकडल्यानंतर चौकशीत अमनप्रितसिंग व जनार्धनचा सहभाग निष्पन्न झाला. ही कारवाई पीआय अतुल भोसले, सपोनि रवी वाहुळे, पीएसआय दासरे, अंमलदार देविदास चव्हाण, दिलीप चंचलवार, ज्ञानोबा कवठेकर, रितेश कुलथे, उमर शेख, शितल सोळंके, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, खंडणी विरोधी पथकाचे शिलराज ढवळे, ब्रम्हानंद लामतुरे, प्रदिप गर्दनमारे, व्यंकट गंगुलवार, राजबंतसिंध बंगई, हेमंत विचकेवार, सायबर सेलचे राजू सिटीकर व दीपक ओढणे यांनी केली. आरोपींवर वजीराबाद पोलिसांत एनडीपीएस अॅक्टच्या कलम ८ (क), २१ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT