नांदेड

Nanded crime : किनवट पोलिसांची धडक कारवाई: सिंदगीत ३६ हजारांचे ६०० लिटर मोहफुलाचे रसायन जप्त; एकावर गुन्हा दाखल

मोहफुलापासून दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन विक्रीच्या उद्देशाने घरात साठवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले

पुढारी वृत्तसेवा

किनवट : तालुक्यातील सिंदगी येथे पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘मास रेड’ कारवाईदरम्यान अवैधरित्या साठवून ठेवलेले तब्बल ३६ हजार रुपये किमतीचे ६०० लिटर मोहफुलाचे फसफसते रसायन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

कारवाईचा तपशील

२७ जून रोजी किनवट पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सिंदगी येथील एका घरावर छापा टाकला. संबंधित महिलेने कोणत्याही वैध परवान्याशिवाय, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोहफुलापासून दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन विक्रीच्या उद्देशाने घरात साठवून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.

मुद्देमाल जप्त

छापा टाकल्यानंतर पोलिसांना घराच्या परिसरात प्रत्येकी ३०० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या सापडल्या. या टाक्यांमध्ये एकूण ६०० लिटर मोहफुलाचे फसफसते रसायन भरलेले होते. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून, त्याची एकूण किंमत ३६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस कारवाई

या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल ओंकार सुरेश पुरी यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई), (ब) व (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष डगवाल करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT