किनवट : जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाउन’ मोहिमेअंतर्गत किनवट पोलिसांनी अंबाडी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह अंदाजे १५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रसाद दर्शनलाल जैस्वाल (रा. अंबाडी, ता. किनवट) याच्या राहत्या घरी बुधवारी रात्री सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यावेळी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००/२६ नोंदविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे, पोलीस हवालदार गजानन डुकरे, डगवाल, पुरी तसेच महिला पोलीस शिपाई अन्नमवार, जानगेवाड व सदाशिव अनंतवार यांचा सहभाग होता.