NDCC Bank pudhari photo
नांदेड

NDCC bank board dissolved : नांदेड जिल्हा सह. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

मुदत संपलेले संचालक मंडळ निष्प्रभावित करण्यात आले असून जिल्हा उप निबंधकांना प्राधिकृत अधिकारी करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर आणि बिलोली येथील शाखांच्या नव्या इमारतींचे उद्घाटन धूमधडाक्यात झाल्या झाल्या, मुदत संपलेले संचालक मंडळ निष्प्रभावित करण्यात आले असून जिल्हा उप निबंधकांना प्राधिकृत अधिकारी करण्यात आले आहे.

बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपुष्टात आला होता; पण तत्पूर्वी किंवा नंतरच्या तीन आठवड्यांत सहकार - विभागाकडून कोणताही आदेश प्राप्त न झाल्यामुळे संचालक मंडळ कार्यरत होते.

मुदत संपल्यानंतर वरील मंडळाने बँकेच्या - भोकर शाखेच्या नव्या इमारतीचे आणि बिलोली येथील नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन गेल्या आठवड्यात संपन्न केले. भोकर येथील कार्यक्रमास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. पण या कार्यक्रमात संचालक मंडळास बरखास्त करण्याबाबत त्यांनी साधे सूतोवाचही केले उलट नव्हते. संचालक मंडळाची प्रशंसाच त्यांनी केली.

दसऱ्या दिवशी बिलोलीच्या कार्यक्रमाचे उद्घाटकही सहकारमंत्रीच होते. मात्र या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा झाली. निवडणूक होईपर्यंत आपणच सत्तेत राहू, अशी विद्यमान संचालक मंडळाची धारणा झालेली असताना सोमवारी हे मंडळ निष्प्रभावित उलटसुलट करण्यासंबंधीचा आदेश प्राप्त झाला.

विभागीय सह निबंधक प्रवीण फडणीस यांचा पाच पानी आदेश सोमवारी दुपारनंतर बँकेच्या मुख्यालयास प्राप्त झाला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७७अ अन्वये त्यांनी हा आदेश जारी केला.

वरील आदेशात कायद्याच्या अनुषंगाने बराच ऊहापोह करण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आला असून त्यांची पदे रिक्त झाली असल्याने सदर संस्थेवर दैनंदिन कामकाजासाठी सहकार अधिनियमातील कलम ७७ अ अन्वये कार्यवाही करणे क्रमप्राप्त झाले असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

वरील बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. या पार्श्वभूमीवर सदर बँकेवर अशासकीय सदस्यांचे मंडळ नियुक्त करणे सयुक्तिक होणार व प्राधिकृत अधिकारी म्हणून शासकीय अधिकारी नेमणे योग्य होईल, असे माझे मत झाल्याचे नमूद करून फडणीस यांनी बँकेचे संचालक मंडळ निष्प्रभावित केले.

दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था या पदावर कार्यरत असलेले शाहुराज हिरे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT