नांदेड : दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या प्रकरणात मदत करण्यासाठी विमानतळ पोलिस ठाण्याचे पीएसआय व जमादार यांनी एका महिलेला तीन लाखांची लाच मागितली. या प्रकरणात मंगळवारी (दि. २३) महिलेकडून एक लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार महिलेच्या पतीने भाऊ, आई व इतर जणां विरोधात जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी दीड लाखाची व दुसऱ्या एका प्रकरणात तक्रारदार महिलाच्या आई व वडिलांवर फसवणुकीचा, विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणात मदत करण्यासाठी दीड लाख असे एकूण तीन लाख रुपयांची मागणी पीएसआय गोविंद जाधव व जमादार वैजनाथ तांबोळी यांनी केली होती.