नांदेड : नांदेडहून भोकर कडे भर वेगात प्रवासी घेऊन येणाऱ्या मॅजिक गाडी चालकाने सीता खांडी जंगलात एका ट्रकला जोराची धडक दिल्याने मॅजिक मधील 6 प्रवासी जागीच ठार झाले तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्दैवी घटना ऐन पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.
अधिक माहिती अशी की गुरुवार दि. 10 सप्टेंबर26 रोजी सायंकाळी नांदेडहुन भोकर कडे अवैध प्रवासी वाहतूक घेऊन येणारी मॅजिक एम एच 26 ए.के 0548 ही भोकर जवळ सीताखांडी घाटात एका मालवाहू ट्रक क्र. ए.पी 29टी. ए. या ट्रकला जोराची धडक दिली.
मॅजिक गाडीतील सय्यद अलमास रा. बिलार नगर भोकर,शेख फिरोज रा. भोकर पांडुरंग लिंगू वाघमारे मिस्त्री व त्याची पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे रा. सय्यद नगर भोकर बलवान पवार रा. पोटातांडा ता. हदगाव एक अनोळखी असे सहा जण ठार झाले.
तर गंभीर जखमी मध्ये बासुुमिया शेख काजुमिया रा. कागज नगर तेलंगणा ट्रक चालक शेख खलील शेख वहिद रा. भोकर सोमनाथ मारुती येळगे रा. जांभळज ता. हादगाव हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालयात एकच तोबा गर्दी उसळली आहे ऐन पोळ्याच्या दिवशी अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ होत आहे.