मृत संदीप संभाजी पिंगळे 
नांदेड

Nanded Accident | उमरी पोलीस ठाण्यातील होमगार्डचा कर्तव्यावर असतांना अपघाती मृत्यू; दुचाकीची समोरासमोर धडक!

शिक्षक दाम्पत्य गंभीर जखमी, उमरी धर्माबाद रोडवरील हिरडगाव शिवारात घटना

पुढारी वृत्तसेवा

उमरी : उमरी तालुक्यात आज रविवारी सात दिवशीय गणेश विसर्जनाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कर्तव्यावरून परत येताना एका होमगार्डचा अपघातात मृत्यू झाला असून शिक्षक दाम्पत्य गंभीर जखमी झाले.जखमीला नांदेडला पाठविण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उमरी धर्माबाद रोडवरील हिरडगाव शिवारात घडली आहे.

मयत होमगार्डचे नाव संदीप संभाजी पिंगळे वय 32 वर्षे, रा. सोमठाणा ता.उमरी असे आहे. ते उमरी पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. दि. 20 रोजी मंडाळा येथे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. ड्युटी आटोपून परत येत असताना वाटेत समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलची त्यांच्या गाडीला समोरासमोर जोरदार धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की होमगार्ड संदीप पिंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. समोरच्या मोटारसायकलवरील राजेश बालाजी जाधव ( जि.प. प्राथमिक शाळा तळेगाव येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत ) आणि त्यांच्या पत्नी सौ. उज्वला राजेश जाधव दोघे रा. येडाळा, ता. उमरी हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे.

कुटुंबावर शोककळा

होमगार्ड संदीप पिंगळे हे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने सोमठाणा गावावर आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT